१ करिंथ 15:54-57
१ करिंथ 15:54-57 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे व हे जे मरणाधीन आहे त्याने अमरत्व धारण करावे, असे जेव्हा होईल तेव्हा, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे; “विजयात मरण गिळले गेले आहे.” “अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? मरणा, तुझी नांगी कोठे आहे?” मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्रापासून येते. पण देवाला धन्यवाद असो, जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हास विजय देतो!
१ करिंथ 15:54-57 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा जे नाशवंत आहे ते अविनाशीपण परिधान करेल, आणि जे मर्त्य आहे ते अमरत्व, तेव्हा हे शास्त्रलेखातील वचन सत्य होईल: “विजयाने मृत्यूला गिळंकृत केले आहे.” “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?” कारण मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.
१ करिंथ 15:54-57 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा “मरण विजयात गिळले गेले आहे” असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?” मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे; परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो.
१ करिंथ 15:54-57 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा ‘मरण विजयात गिळले गेले आहे’ असा जो धर्मशास्त्रलेख आहे, तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला विजयी करतो त्याला धन्यवाद!