१ करिंथ 15:42-44
१ करिंथ 15:42-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठविण्यात येते ते अविनाशी आहे. जे अपमानात पुरले जाते ते गौरवात उठवले जाते जे अशक्तपणात पुरले जाते ते सामर्थ्यात उठते. जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठवले जाते ते आत्मिक शरीर आहे. जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुद्धा असतात.
१ करिंथ 15:42-44 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अशाप्रकारे ज्यांचे मरणातून पुनरुत्थान झाले त्यांचे होईल. नाशवंत असे शरीर पेरले जाते, अविनाशी असे उठविले जाते. अपमानात पेरले जाते पण गौरवात उठविले जाते आणि अशक्तपणात पेरले जाते पण शक्तित उठविले जाते. नैसर्गिक शरीर पेरले जाते, आत्मिक शरीर उठविले जाते. जर नैसर्गिक शरीर आहे तर आत्मिक शरीरही आहे.
१ करिंथ 15:42-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते; जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते; प्राणमय1 शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे.
१ करिंथ 15:42-44 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते. जे विरूपतेत व अशक्तपणात पेरले जाते, ते सौंदर्ययुक्त शक्तिमान स्वरूपात उठवले जाते, भौतिक शरीर म्हणून पुरले जाते, आध्यात्मिक शरीर म्हणून उठवले जाते. अर्थात भौतिक शरीर आहे म्हणून आध्यात्मिक शरीरही असायला हवे.