१ करिंथ 14:5
१ करिंथ 14:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे, पण विशेषतः तुम्ही संदेश द्यावेत अशी माझी इच्छा आहे कारण जो कोणी अन्य भाषांत बोलतो, त्याच्यापेक्षा जो संदेश देतो तो मोठा आहे. यासाठी की, मंडळीची उन्नती व्हावी.
१ करिंथ 14:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे अशी माझी इच्छा आहे, परंतु त्याऐवजी तुम्ही संदेश देणारे व्हावे. कारण अन्य भाषा बोलण्यार्यांनी अर्थ नाही सांगितला तर मंडळीची उन्नती कशी होईल, पण त्यापेक्षा संदेश देणारे अधिक श्रेष्ठ आहेत.
१ करिंथ 14:5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्यात, तरी विशेषत: तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे; कारण मंडळीच्या उन्नतीकरता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे.
१ करिंथ 14:5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुम्ही सर्वांनी अपरिचित भाषा बोलाव्यात, अशी माझी इच्छा आहे. परंतु विशेषत: तुम्ही संदेश द्यावा, अशी माझी मनीषा आहे; कारण ख्रिस्तमंडळीच्या उन्नतीकरिता अपरिचित भाषांचा अर्थ सांगणारा नसेल, तर जो अपरिचित भाषा बोलतो, त्याच्यापेक्षा देवाचा संदेष्टा श्रेष्ठ आहे.