YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 10:1-20

१ करिंथ 10:1-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले; मेघ व समुद्र ह्यांच्या द्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला; त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले; आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले. कारण ते आपल्यामागे चालणार्‍या आध्यात्मिक खडकातून पीत होते; तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता; ह्यामुळे ‘त्यांचा रानात नाश झाला.’ ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणांदाखल झाल्या, अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते तसे तुम्ही होऊ नका; कारण “लोक खायलाप्यायला बसले, नंतर नाचतमाशा करायला उठले” असे शास्त्रात लिहिले आहे. त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची2 परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगांच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत3 त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा. तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो; मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. जे जात्याच इस्राएल त्यांच्याकडे पाहा; यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य काहीतरी आहे, अथवा मूर्ती काहीतरी आहे, असे माझे म्हणणे आहे काय? नाही; तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ‘ते देवाला नव्हे तर भुतांना करतात’; आणि तुम्ही भुतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.

सामायिक करा
१ करिंथ 10 वाचा

१ करिंथ 10:1-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

बंधूनो, तुम्हास हे माहीत असावे असे मला वाटते की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते. ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरुप पार गेले. मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वाचा मेघात व समुद्रात बाप्तिस्मा झाला. त्यांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले. व ते एकच आत्मिक पेय प्याले कारण ते त्यांच्यामागून चालणाऱ्या खडकातून पीत होते आणि तो खडक ख्रिस्त होता. परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकांविषयी आनंदी नव्हता आणि त्यांची प्रेते अरण्यात पसरली होती. आणि या गोष्टी आमच्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या, कारण ज्याप्रमाणे त्यांनी वाईट गोष्टींची अपेक्षा केली, त्याप्रमाणे आपण वाईटाची इच्छा धरणारे लोक होऊ नये. त्यांच्यापैकी काहीजण मूर्तीपुजक होते तसे होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते मूर्तीसमोर शरीरासंबंधाच्या हेतूने नाच करण्यासाठी उठले.” ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केले तसे व्यभिचार आपण करू नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले. आणि त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, ते सापांकडून मारले गेले. कुरकुर करू नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाला की, ते मृत्युदूताकडून मारले गेले. या गोष्टी त्यांच्याबाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या व त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे. जे मनुष्यास सामान्य नाही अशा कोणत्याही परीक्षेने तुम्हास घेरले नाही. परंतु देव विश्वसनीय आहे. तुम्हास सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या परीक्षेबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हास सहन करणे शक्य होईल. तेव्हा, माझ्या प्रियांनो, मूर्तीपूजा टाळा. मी तुमच्याशी बुद्धीमान लोक समजून बोलत आहे. मी काय बोलत आहे याचा तुम्हीच न्याय करा. जो “आशीर्वादाचा प्याला” आम्ही आशीर्वादित करण्यास सांगतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागीतेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळजण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. देहासंबंधाने इस्राएल राष्ट्राकडे पाहा. जे अर्पण केलेले खातात ते वेदीचे भागीदार आहेत नाही का? तर मी काय म्हणतो? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे? नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जे अर्पण देवरहित परराष्ट्रीय लोक करतात ते अर्पण भूतांना करतात, देवाला करीत नाहीत आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही.

सामायिक करा
१ करिंथ 10 वाचा

१ करिंथ 10:1-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

बंधू व भगिनींनो, आपल्या पूर्वजांनी मेघाखाली कूच केली. ते सर्वजण समुद्रातूनही पार गेले, याबद्दल आपण अज्ञानी असू नये. मेघात आणि समुद्रात त्यांचा व मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्ले. ते सर्वजण तेच आध्यात्मिक पाणी प्याले. त्यांच्याबरोबर चाललेल्या आत्मिक खडकातून ते पाणी प्याले आणि हा खडक तर ख्रिस्त होते. हे सर्व असूनही, परमेश्वर त्या बहुतेकांविषयी संतुष्ट नव्हते; त्यामुळे त्यांची शरीरे अरण्यात विखुरली गेली. आता ज्यागोष्टी घडल्या, त्या आपल्याला उदाहरणादाखल आणि आपण त्यांच्याप्रकारे आपली हृदये वाईट गोष्टींवर केंद्रित करू नयेत म्हणून घडल्या. त्यांच्यातील काही मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. असे लिहिले आहे: “लोकांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले.” त्याचप्रमाणे त्यांच्यातील काही लोकांनी लैंगिक अनीतीला वाव दिला, तसे आपण करू नये आणि एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले. आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले. आणि कुरकुर करू नका, जशी त्यांच्यापैकी काहींनी केली आणि ते नाश करणार्‍या दूताच्या हातून मरण पावले. आता या गोष्टी त्यांच्यासाठी उदाहरणादाखल झाल्या आणि ज्या आपणावर युगाचा शेवट येऊन ठेपला आहे, त्या आपल्याला इशारा म्हणून लिहून ठेवण्यात आल्या आहेत. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्थिर उभे आहात, तर आपण पडू नये म्हणून खबरदारी घ्या. मनुष्यमात्रावर येणार्‍या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळी परीक्षा तुम्हावर आलेली नाही आणि परमेश्वर विश्वासू आहेत; ते तुमच्या सहनशक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाहीत. तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणून परीक्षा आली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सिद्ध करतील. यास्तव, माझ्या प्रिय मित्रांनो, मूर्तिपूजेपासून दूर पळा. मी बुद्धिमान लोकांबरोबर बोलतो; मी जे तुम्हाला सांगत आहे त्याची पारख तुम्हीच करा. उपकारस्तुतीचा प्याला ज्याबद्दल आपण उपकारस्तुती करतो ती ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सहभागिता नाही का? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराशी सहभागिता नाही का? कारण भाकर एक आहे, आम्ही पुष्कळजण असलो तरी एक शरीर आहोत, आपण सर्वजण एकाच भाकरीचे सहभागी आहोत. इस्राएली लोकांचा विचार करा: वेदीवर अर्पण केलेले यज्ञबली जे खातात, ते वेदीशी सहभागी होतात की नाही? मूर्तींना अर्पिलेल्या अन्नास काही महत्त्व आहे किंवा मूर्तीला काही महत्त्व आहे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे काय? नाही! गैरयहूदी लोक परमेश्वराला यज्ञ अर्पण करीत नसून भुतांना अर्पण करतात आणि भुतांशी तुम्ही सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.

सामायिक करा
१ करिंथ 10 वाचा

१ करिंथ 10:1-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले; मेघ व समुद्र ह्यांच्या द्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला; त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले; आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले. कारण ते आपल्यामागे चालणार्‍या आध्यात्मिक खडकातून पीत होते; तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता; ह्यामुळे ‘त्यांचा रानात नाश झाला.’ ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणांदाखल झाल्या, अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते तसे तुम्ही होऊ नका; कारण “लोक खायलाप्यायला बसले, नंतर नाचतमाशा करायला उठले” असे शास्त्रात लिहिले आहे. त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची2 परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगांच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत3 त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा. तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो; मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. जे जात्याच इस्राएल त्यांच्याकडे पाहा; यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य काहीतरी आहे, अथवा मूर्ती काहीतरी आहे, असे माझे म्हणणे आहे काय? नाही; तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ‘ते देवाला नव्हे तर भुतांना करतात’; आणि तुम्ही भुतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.

सामायिक करा
१ करिंथ 10 वाचा

१ करिंथ 10:1-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

बंधुजनहो, आपले पूर्वज मेघाखाली होते आणि तांबड्या समुद्रातून ते सर्व पार गेले, ह्याची आपण आठवण ठेवावी, अशी माझी इच्छा आहे. मेघात व समुद्रात मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व एकाच प्रकारचे आध्यात्मिक पाणी प्यायले कारण ते त्यांच्याबरोबर जात असलेल्या आध्यात्मिक खडकांतून पीत होते. तो खडक तर स्वतः ख्रिस्त होता. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. ह्या गोष्टी आपल्यासाठी उदाहरणादाखल घडल्या. अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. ‘लोक खायला प्यायला बसले, नंतर धुंद होऊन लैंगिक गैरवर्तन करायला उठले’, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे. त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले, म्हणून आपण जारकर्म करू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सर्पदंशाने नाश पावले. म्हणून आपण त्यांच्यासारखी प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, म्हणून तशी कुरकुर आपण करू नये. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या व आपल्याला इशारा देण्यासाठी त्या लिहून ठेवण्यात आल्या आहेत कारण आपण युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहचलो आहोत. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. लोकांना सर्वसाधारणपणे ज्या कसोटीतून जावे लागते अशाच प्रकारची कसोटी तुमच्यावर गुदरलेली आहे. देव विश्वसनीय आहे, तो तुमची कसोटी तुमच्या शक्तीपलीकडे पाहणार नाही, तर ती सहन करायला तुम्हांला समर्थ करील व अशा प्रकारे कसोटीबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही दाखवील. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा. तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो, मी काय म्हणतो त्याचा निर्णय तुम्हीच करा. जो प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्तामधील सहभाग नाही काय? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीरामधील सहभागिता नाही काय? भाकर एक असल्यामुळे, आपण जरी अनेक असलो तरी त्या एका भाकरीत सहभागी झाल्यामुळे, आपण एक शरीर असे आहोत. जे जात्याच इस्राएली आहेत त्यांच्याकडे पाहा: यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार असतात ना? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य महत्त्वाचा की, मूर्ती महत्त्वाची? तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भुतांना करतात. तुम्ही भुतांचे भागीदार व्हावे अशी माझी इच्छा नाही.

सामायिक करा
१ करिंथ 10 वाचा