१ करिंथ 1:3-6
१ करिंथ 1:3-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून कृपा व शांती असो. ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या देवाचे उपकार मानतो. त्याने तुम्हास प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात समृद्ध केले आहे. जशी ख्रिस्ताविषयी साक्ष खरी असल्याची खात्री तुम्हामध्ये झाली तसल्याच प्रकारे त्याने तुम्हासही संपन्न केले आहे.
१ करिंथ 1:3-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. ख्रिस्त येशूंमध्ये जी कृपा तुम्हाला दिली, त्याबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो. त्यांच्यामध्ये तुम्ही सर्वप्रकारे संपन्न झाला आहात—सर्वप्रकारच्या भाषणात व सर्व ज्ञानात समृद्ध झाला आहात. ख्रिस्ताविषयीची जी आमची साक्ष आहे त्याची परमेश्वर तुमच्यामध्ये पुष्टी करीत आहे.
१ करिंथ 1:3-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो. ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती सर्वदा करतो; तो अनुग्रह हा की, जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झालात
१ करिंथ 1:3-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची कृपा व शांती तुम्हांला लाभो. ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेमुळे मी तुमच्याविषयी देवाचे सर्वदा आभार मानतो; कारण जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढ झाली, तसतसे तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत, अगदी बोलण्यात व ज्ञानातदेखील, संपन्न झालात.