१ करिंथ 1:13-17
१ करिंथ 1:13-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणाचाही बाप्तिस्मा मी केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो. न जाणो, तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावाने झाला असे कोणी म्हणायचा! (आणखी मी स्तेफनाच्या घरच्यांचाही बाप्तिस्मा केला; त्यांच्याखेरीज मी दुसर्या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही.) कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यास पाठवले; पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास पाठवले नाही.
१ करिंथ 1:13-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा झाला का? मी देवाचे आभार मानतो की, क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही. यासाठी की, माझ्या नावात तुमचा बाप्तिस्मा करण्यात आला, असे कोणीही म्हणू नये. स्तेफनाच्या घरच्यांचा सुद्धा मी बाप्तिस्मा केला, याव्यतिरीक्त, तर इतर कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही. कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही तर शुभवर्तमान सांगण्यासाठी पाठवले, ते देखील मानवी ज्ञानाने नव्हे, यासाठी की, ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूचे सामर्थ्य व्यर्थ होऊ नये.
१ करिंथ 1:13-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्त विभागले गेले आहेत का? तुमच्यासाठी पौलाला क्रूसावर दिले होते का? तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावात झाला होता का? तुमच्यातील क्रिस्प आणि गायस यांच्याशिवाय मी इतर कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. त्यामुळे तुम्हापैकी कोणालाही, तुमचा बाप्तिस्मा माझ्या नावात झाला असे म्हणता येणार नाही. होय! मी स्तेफनाच्या कुटुंबियांचाही बाप्तिस्मा केला, पण त्यांच्याशिवाय दुसर्या कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही. कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्याकरिता नव्हे, तर शुभवार्तेचा प्रचार करण्याकरिता पाठविले आहे—वाक्पटुतेने व ज्ञानाने नव्हे, यामुळे असे न होवो की ख्रिस्ताच्या क्रूसाचे सामर्थ्य रिक्त व्हावे.
१ करिंथ 1:13-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी क्रुसावर चढवले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणालाही बाप्तिस्मा मी दिला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो. नाही तर, तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावाने दिला गेला, असे कोणी म्हणावयाचा! आणखी मी स्तेफनच्या घरच्यांनाही बाप्तिस्मा दिला. त्यांच्याखेरीज मी दुसऱ्या कोणाला बाप्तिस्मा दिला की नाही, हे माझ्या लक्षात नाही. ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा देण्यास नव्हे तर शुभवर्तमान घोषित करायला पाठविले, पण ख्रिस्ताचा क्रूस व्यर्थ होऊ नये म्हणून क्रुसाविषयी वाक्चातुर्याने सांगण्यास मला पाठवले नाही.