YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 29:26-30

१ इतिहास 29:26-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या प्रकारे इशायाचा पुत्र दावीद ह्याने सर्व इस्राएलावर राज्य केले. त्याने चाळीस वर्षे इस्राएलावर राज्य केले; हेब्रोनात सात वर्षे व यरुशलेमेत तेहेतीस वर्षे. आयुष्य, धन व मान ह्यांनी संपन्न होऊन आणि चांगला वृद्ध होऊन तो मृत्यू पावला; त्याचा पुत्र शलमोन त्याच्याजागी राजा झाला. दावीद राजाचे साद्यंत वृत्त अथपासून इतिपर्यंत शमुवेल द्रष्टा ह्याच्या ग्रंथात, नाथान संदेष्टा ह्याच्या ग्रंथात आणि गाद द्रष्टा ह्याच्या ग्रंथात लिहिले आहे. त्याची सर्व कारकीर्द, त्याचा पराक्रम, त्याच्यावर व इस्राएलावर व देशोदेशींच्या राज्यांवर काय-काय प्रसंग गुदरले हेही त्यांत लिहिले आहे.

सामायिक करा
१ इतिहास 29 वाचा

१ इतिहास 29:26-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इशायाचा पुत्र दावीद याने संपूर्ण इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले. दावीदाने इस्राएलावर राज्य केले तो काळ चाळीस वर्षाचा होता. तो हेब्रोन नगरात सात वर्षे राजा होता. मग यरूशलेमामध्ये त्याची कारकीर्द तेहतीस वर्षांची होती. पुढे वृध्द झाल्यावर दावीदाला मृत्यू आला. त्यास सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्यास कमतरता नव्हती. त्यानंतर त्याच्या पुत्र शलमोन राजा झाला. राजा दावीदाचा इतिहास पहिल्यापासून शेवटपर्यंत संदेष्टा शमुवेल याच्या ग्रंथात आणि संदेष्टा नाथानाच्या ग्रंथात तसेच गाद या संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिलेला आहे. त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि सर्व देश यांच्यावर या काळात आलेले प्रसंग याची हकीकत या ग्रंथांमध्ये आहे.

सामायिक करा
१ इतिहास 29 वाचा

१ इतिहास 29:26-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

अशाप्रकारे इशायाचा पुत्र दावीदाने सर्व इस्राएलावर राज्य केले. दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले. तो वयोवृद्ध होऊन मरण पावला, त्याने दीर्घायुष्य घालविले, संपत्ती आणि मान मिळविला. त्याच्या जागी त्याचा पुत्र शलोमोन राज्य करू लागला. दावीद राजाच्या कारकिर्दीतील घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्रष्टा शमुवेल, संदेष्टा नाथान आणि द्रष्टा गाद यांच्या ग्रंथात लिहिल्या आहेत. त्याच्या राज्याचा सर्व वृत्तांत, त्याचे सामर्थ्य, त्याच्यावर आणि इस्राएलावर आणि इतर शेजारील राष्ट्रांच्या राजांवर जे बरे वाईट प्रसंग आले, ते सर्व या ग्रंथात नमूद केले आहेत.