१ इतिहास 29:23-25
१ इतिहास 29:23-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग शलमोन आपला बाप दावीद ह्याच्याऐवजी राजा होऊन परमेश्वराच्या सिंहासनावर विराजमान झाला व भाग्यवंत झाला; सर्व इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत असत. सर्व सरदार, सर्व शूर वीर व दावीद राजाचे सर्व पुत्र शलमोन राजाचे अंकित झाले. परमेश्वराने शलमोनाचा सर्व इस्राएलादेखत अत्यंत उत्कर्ष केला आणि इस्राएलाच्या कोणत्याही राजाला पूर्वी प्राप्त झाले नव्हते एवढे राजऐश्वर्य त्याला दिले.
१ इतिहास 29:23-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपला पिता दावीदाची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत. एकूणएक सरदार, सैनिक आणि राजा दावीदाची सर्व अपत्ये शलमोन राजाच्या अधीन झाले. परमेश्वरने शलमोनाला सर्व इस्राएलाच्या देखत फार थोर केले. आणि पूर्वी इस्राएलाच्या कोणत्याही राजाला नव्हते असे राजाला ऐश्वर्य मिळाले.
१ इतिहास 29:23-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अशा रीतीने शलोमोन त्याचा पिता दावीदानंतर राजा झाला आणि याहवेहच्या सिंहासनावर बसला. त्याची भरभराट झाली व सर्व इस्राएली लोक त्याच्या आज्ञेत राहिले. सर्व अधिकारी आणि शूरवीर सैनिक, दावीद राजांच्या पुत्रांनी राजा शलोमोनशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले. याहवेहने शलोमोनाला इस्राएलीदेखत सर्वाधिक सन्मान दिला आणि इस्राएलमध्ये कोणत्याही राजाला त्याच्यासारखे शाही ऐश्वर्य दिले नव्हते.