YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 23:2-32

१ इतिहास 23:2-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्याने इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना एकत्र बोलावून घेतले. तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. त्यांची संख्या एकंदर अडतीस हजार होती. त्यांच्यातले, चोवीस हजार लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणारे होते आणि सहा हजार अधिकारी आणि न्यायाधीश होते. चार हजार द्वारपाल होते आणि दावीद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे चार हजार होते. लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ आणि मरारी यांच्या घराण्यानुसार दावीदाने सर्व लेवींची तीन गटांमध्ये विभागणी केली. गेर्षोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते. लादान याला तीन पुत्र. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल. शिमीचे पुत्र असे शलोमोथ, हजिएल व हारान. लादानच्या घराण्यांचे हे प्रमुख होते. शिमीला चार पुत्र. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया. यहथ हा त्यांपैकी मोठा, दुसरा जीजा, यऊश आणि बरीया यांना मात्र फार संतती नव्हती त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई. कहाथाला चार पुत्र होते: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल. अहरोन आणि मोशे हे अम्रामचे पुत्र अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, लोकांस आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती. मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे पुत्र लेवीच्या वंशातच गणले जात. गेर्षोम आणि अलियेजर हे मोशेचे पुत्र. शबुएल हा गेर्षोमचा थोरला पुत्र. रहब्या हा अलियेजरचा थोरला पुत्र. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच अपत्य झाली. शलोमीथ हा इसहारचा पहिला पुत्र. हेब्रोनचे पुत्र याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा. उज्जियेलाचे पुत्र: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया. महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. एलाजार आणि कीश हे महलीचे पुत्र. एलाजाराला कन्या रत्नेच झाली. त्यास पुत्र नव्हता. या कन्यांचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशाच्या घराण्यात गेल्या. मूशीचे पुत्र: महली, एदर आणि यरेमोथ. हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची मोजणी झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम. दावीद म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकांस शांती लाभली आहे. परमेश्वर यरूशलेमेला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे. तेव्हा लेवींना निवासमंडप आणि उपासनेतील सेवेचे इतर पात्रे सतत वाहण्याची गरज पडणारहि नाही.” लेवी कुळातील वंशजांची मोजदाद करणे ही दावीदाची इस्राएल लोकांस अखेरची आज्ञा होती. त्यानुसार वीस वर्षे आणि त्यापुढील वयाच्या मनुष्यांची मोजणी झाली. अहरोनाच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवीचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुध्द ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत. मंदिरातील समर्पित भाकर मेजावर ठेवणे, पीठ, अन्नार्पण करण्याच्या वस्तू बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती. याखेरीज, तव्यावर भाजलेले, मळलेले सर्वकाही सिध्द करणे, मोजून मापून त्या वस्तूंची तयारी करणे हे ही काम त्यांच्याकडे होते. ते रोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत. आणि परमेश्वरास शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या आणि नेमलेल्या सणाच्या दिवशी ठरलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरापुढे सर्व होमार्पणे अर्पण करण्यास हजर राहत. ते दर्शनमंडप, पवित्रस्थानाचे प्रमुख होते. आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते.

सामायिक करा
१ इतिहास 23 वाचा

१ इतिहास 23:2-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याने इस्राएलाचे सर्व सरदार, याजक व लेवी ह्यांना एकत्र केले. तीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जितके लेवी होते त्यांची गणती केली; त्यांची शिरगणती केली ती अडतीस हजार भरली. त्यांतले चोवीस हजार परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले; सहा हजार अंमलदार व न्यायाधीश होते; चार हजार द्वारपाळ होते; आणि परमेश्वराची स्तोत्रे म्हणणार्‍यांसाठी दाविदाने जी वाद्ये केली होती त्यांवर परमेश्वराचे स्तवन करण्यासाठी चार हजार माणसे नेमली. लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी ह्यांच्या कुळांप्रमाणे दाविदाने त्यांचे वर्ग केले होते. गेर्षोन्यातले लादान व शिमी; लादानाचे पुत्र यहीएल मुख्य व जेथाम व योएल असे तीन; शिमीचे पुत्र शलोमोथ, हजिएल व हारान असे तीन; हे लादानाच्या पितृकुळांचे मुख्य होते; आणि शिमीचे पुत्र यहथ, जीजा, यऊश व बरीया; हे चौघे शिमीचे पुत्र; यहथ हा प्रमुख व जीजा हा दुसरा; यऊश व बरीया ह्यांची पुत्रसंतती बहुत नव्हती, म्हणून त्यांचे एकच पितृकुळ ठरवले. कहाथाचे पुत्र अम्रान, इसहार, हेब्रोन व उज्जीएल असे चार; अम्रामाचे पुत्र अहरोन व मोशे; अहरोनास वेगळे करण्यात आले ते अशासाठी की त्याने व त्याच्या वंशजांनी परमपवित्र वस्तू निरंतर पवित्र राखाव्यात; परमेश्वरासमोर निरंतर धूप जाळावा, त्याची सेवाचाकरी करावी व त्याच्या नामाने आशीर्वाद द्यावा. देवाचा माणूस मोशे ह्याचे पुत्र लेवी वंशात मोडत. मोशेचे पुत्र गेर्षोम व अलियेजर. गेर्षोमाच्या पुत्रांमध्ये शबुएल मुख्य, आणि अलियेजराच्या पुत्रांमध्ये रहब्या मुख्य; अलियेजराला दुसरे पुत्र झाले नाहीत, परंतु रहब्याचे पुत्र बहुत होते. इसहाराच्या पुत्रांमध्ये शलोमीथ मुख्य; हेब्रोनाच्या पुत्रांमध्ये यरीया मुख्य; व अमर्‍या दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम् चौथा; उज्जीएलाच्या पुत्रांमध्ये मीखा मुख्य व इश्शिया दुसरा; मरारीचे पुत्र महली व मूशी; महलीचे पुत्र एलाजार व कीश; एलाजार निपुत्रिक मेला, त्याला केवळ कन्या होत्या; त्यांचे भाऊबंद कीशाचे पुत्र ह्यांनी त्यांच्याशी विवाह केला. मूशीचे पुत्र; महली, एदर व यरेमोथ असे तीन. लेव्याच्या पितृकुळातील मुख्य पुरुष हेच; त्यांची नावे घेऊन शिरगणती केली; ते वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत असत. दावीद म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आपल्या प्रजेस विसावा दिला आहे, व यरुशलेमात त्यांचा निरंतरचा निवास आहे; निवासमंडप व त्यामधील सेवेची उपकरणे ही लेव्यांना पुन्हा वाहून नेण्याची जरूर पडणार नाही.” दाविदाच्या शेवटल्या आज्ञेवरून वीस वर्षांच्या व त्यांहून अधिक वयाच्या लेव्यांची गणती झाली. अहरोन वंशजांच्या हाताखाली परमेश्वराच्या मंदिराची अंगणे व कोठड्या ह्यांत सेवा करणे व सर्व पवित्र वस्तू शुद्ध राखणे हे देवाच्या मंदिरातील सेवेसंबंधीचे सर्व काम त्यांच्याकडे होते. समर्पित भाकर, अन्नबलीसाठी सपीठ, बेखमीर पापड, तव्यावर भाजलेले अथवा मळलेले सर्वकाही सिद्ध करण्याचे व सर्व प्रकारचे मोजमाप करण्याचे काम त्यांच्याकडे होते. सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे नित्य उपकारस्मरण व स्तवन करण्यास त्यांना उभे राहावे लागत असे. तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमलेल्या पर्वणीस ठरवलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेप्रीत्यर्थ दर्शनमंडपाचे व पवित्रस्थानाचे रक्षण करणे आणि त्यांचे भाऊबंद अहरोन वंशज ह्यांना नेमून दिलेल्या कामी मदत करणे हे त्यांचे काम होते.

सामायिक करा
१ इतिहास 23 वाचा