१ इतिहास 18:14-17
१ इतिहास 18:14-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दाविदाने सर्व इस्राएलावर राज्य केले; तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व नीतीने वागे. त्याचा मुख्य सेनापती सरूवेचा पुत्र यवाब हा होता व त्याचा अखबारनवीस अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता; अहीटुबाचा पुत्र सादोक आणि अब्याथाराचा पुत्र अबीमलेख हे याजक होते; शवूशा हा चिटणीस होता; करेथी व पलेथी ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्रही राजाचे मंत्री होते.
१ इतिहास 18:14-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीदाने सर्व इस्राएलावर राज्य केले आणि त्याने त्याच्या सर्व लोकांचा योग्य न्याय करत असे व नीतिने वागत असे. सरुवेचा पुत्र यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट अखबारनवीस त्याचा अधिकारी होता. अहीटूबचा पुत्र सादोक आणि अब्याथारचा पुत्र अबीमलेख याजक होते. शवूशा हा नियमशास्त्र शिक्षक होता. यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार होते.
१ इतिहास 18:14-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दावीदाने संपूर्ण इस्राएलवर राज्य केले व त्याच्या लोकांशी तो न्यायाने व सत्याने वागत असे. जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट नोंदणी करणारा. अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख याजक; शावेशा राजाचा चिटणीस होता. यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य मंत्री होते.