१ इतिहास 12:1-2
१ इतिहास 12:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दावीद सिकलाग येथे कीशाचा पुत्र शौल ह्याच्या भीतीने लपून राहत होता त्या वेळी जे त्याच्याकडे आले व ज्यांनी त्याला युद्धात कुमक केली ते शूर वीर हे : ते धनुर्धारी असून उजव्याडाव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्यबाण मारीत असत; हे शौलाच्या भाऊबंदांपैकी असून बन्यामिनी वंशातले होते.
१ इतिहास 12:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कीशाचा पुत्र शौल याच्या भीतीने दावीद सिकलागला, लपून राहत असताना त्याच्याकडे आलेली माणसे ही होती. ते त्याच्या सैनिकांपैकी असून लढाईत मदत करणारे होते. धनुष्यबाण चालवणे किंवा गोफणगुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या व उजव्या दोन्ही हातांनी करीत होते. बन्यामीनच्या वंशात जे शौलाचे नातेवाईक होते.
१ इतिहास 12:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कीशाचा पुत्र शौलाच्या सानिध्यातून हद्दपार केलेले असताना दावीदाला सिकलाग येथे येऊन मिळालेले योद्धे (ज्यांनी त्याला युद्धात साहाय्य केले त्या योद्ध्यांपैकी असलेले; हे सर्वच धनुर्धारी वीर असून आपल्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्यबाण मारण्यात प्रवीण होते. ते सर्वच बिन्यामीन गोत्रातील आणि शौल राजाचे नातलग होते)