जर आपण त्यांच्या मरणामध्ये त्यांच्याशी अशा रीतीने संयुक्त झालो, तर त्यांच्या पुनरुत्थानामध्येही त्यांच्याशी खात्रीने संयुक्त होऊ. आपल्याला माहीत आहे की आपला जुना स्वभाव त्यांच्याबरोबरच खिळला गेला व पापाच्या अधिकारात असलेले आपले शरीर निर्बल झाले म्हणून यापुढे आपण पापाचे गुलाम असू नये. कारण जो कोणी मरण पावला आहे, तो पापापासून मुक्त झाला आहे. आता जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो, तर त्यांच्याबरोबर जिवंतही होऊ असा आपला विश्वास आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे की, ख्रिस्त मरणातून उठविले गेले ते पुन्हा मरू शकत नाही; यापुढे त्यांच्यावर मरणाची सत्ता चालणार नाही. त्यांचे हे मरण पापासाठी एकदाच मरण होते; पण आता जे जीवन ते जगतात, ते परमेश्वराकरिता जगतात.
रोमकरांस 6 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस 6:5-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ