YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस 15:9-13

रोमकरांस 15:9-13 MRCV

म्हणजे गैरयहूदी लोकांनी परमेश्वराच्या दयेमुळे त्यांचे गौरव करावे. असे लिहिले आहे: “यास्तव गैरयहूदी लोकांमध्ये मी तुमचे स्तवन करेन; व तुमच्या नावाचे गुणगान गाईन.” आणखी असे म्हटले आहे, “अहो, गैरयहूदीयांनो, तुम्हीही त्यांच्या लोकांसह आनंद करा.” आणखी पुन्हा, “सर्व गैरयहूदी लोकांनो प्रभूची स्तुती करा; प्रत्येक राष्ट्र त्यांचे गौरव करो.” आणि यशायाह संदेष्टा म्हणतो, “इशायाचे मूळ उगवेल, व ते राष्ट्रांचा शासक होण्यास उभे राहतील; गैरयहूदीयांच्या आशा त्यांच्यामध्येच आहेत.” तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आशेचे परमेश्वर तुम्हाला सर्व आनंदाने आणि शांतीने भरो, यासाठी की तुमच्यामध्ये असणार्‍या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात विपुल आशेमध्ये तुम्ही वाढत जावे.