YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 78:23-29

स्तोत्रसंहिता 78:23-29 MRCV

त्यांनी आकाशाला उघडण्याची आज्ञा केली; आणि आकाशाचे दरवाजे उघडले; लोकांच्या खाण्याकरिता त्यांनी मान्नाचा वर्षाव केला, त्यांनी स्वर्गातील धान्य त्यांना दिले. मनुष्यांनी देवदूतांची भाकर खाल्ली; त्यांना खाता येईल तेवढे सर्व अन्न त्यांनी दिले. त्यांनी आकाशातून पूर्वेचा वारा सोडला आणि त्यांच्या सामर्थ्याने दक्षिणेकडील वारा वाहू दिला. त्यांनी धुळीप्रमाणे त्यांच्यावर मांसाचा पाऊस पाडला, समुद्रातील वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला. त्यांनी त्यांच्या छावणीच्या आत, त्यांच्या तंबूच्या सभोवती खाली यावयास लावले. त्यांनी अधाशीपणाने तृप्त होईपर्यंत खाल्ले— त्यांनी जे मागितले होते, ते सर्व त्यांना दिले.