YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 18:37-50

स्तोत्रसंहिता 18:37-50 MRCV

मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला, त्यांना गाठले; त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही. मी त्यांना असे तुडविले आहे, की ते उठू शकले नाही, ते माझ्या पायाखाली पडले. तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले; माझ्या शत्रूंना तुम्ही माझ्यासमोर लीन केले. तुम्ही माझ्या वैर्‍यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले, आणि मी माझ्या शत्रूंचा नाश केला. त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते; त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. वार्‍यावर उडून जाणार्‍या धुळीप्रमाणे मी त्यांचा भुगा केला; रस्त्यावरील चिखलाप्रमाणे त्यांना तुडवून टाकले. लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली; राष्ट्रांचा प्रमुख म्हणून तुम्ही मला नेमले. ज्या लोकांची मला ओळख नव्हती ते आता माझी सेवा करतात, परदेशीय माझ्यासमोर भीतीने वाकतात; माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात. त्या सर्वांचे धैर्य खचून गेले, ते त्यांच्या गडातून थरथर कापत बाहेर येतात. याहवेह जिवंत आहेत! माझ्या खडकाची स्तुती असो! परमेश्वर माझा तारणारा सर्वोच्च असो! परमेश्वरच आहेत जे माझ्यासाठी सूड घेतात, ते राष्ट्रांना माझ्या अधीन करतात, ते माझी माझ्या वैर्‍यांपासून सुटका करतात. तुम्ही मला माझ्या वैर्‍यांपेक्षा उंचावले आहे; हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले. म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन; मी आपल्या नावाची स्तुती गाईन. ते आपल्या राजाला महान विजय देतात; ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा प्रीती करतात.