YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 118:15-29

स्तोत्रसंहिता 118:15-29 MRCV

नीतिमान लोकांच्या घरातून आनंदाच्या व विजयाच्या गीतांचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत: “याहवेहच्या उजव्या भुजाने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत! याहवेहचा उजवा हात उंचावलेला आहे; याहवेहच्या उजव्या भुजेने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत!” मी मरणार नाही तर जगेन, आणि याहवेहची कृत्ये विदित करेन. याहवेहने मला कठोर शिक्षा केली, परंतु त्यांनी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. माझ्यासाठी नीतिमत्वाची दारे उघडू द्या; मी आत प्रवेश करून याहवेहचे उपकारस्मरण करेन. याहवेहची दारे हीच आहेत; याच दारातून नीतिमान प्रवेश करतात. मी तुम्हाला धन्यवाद देईन, कारण तुम्ही माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले; तुम्ही माझे तारण झाला आहात. जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला, तोच आता कोनशिला झाला आहे; ही याहवेहची करणी आहे, आणि आमच्या दृष्टीने ती अद्भुत आहे. याहवेहने आज हे केले आहे; आजच आपण आनंद व उल्लास करू. याहवेह, आमचे तारण करा! याहवेह, आम्हाला यशस्वी करा! याहवेहच्या नावाने येणारे धन्यवादित असो. आम्ही याहवेहच्या मंदिरातून तुम्हाला आशीर्वाद देतो. याहवेहच परमेश्वर आहेत; त्यांनी त्यांचा प्रकाश आमच्यावर टाकला आहे. डहाळ्या हातात घेऊन वेदीच्या शिंगापर्यंत जाण्यासाठी मिरवणुकीत सामील व्हा. तुम्हीच माझे परमेश्वर आहात आणि मी तुमचे स्तवन करेन; तुम्हीच माझे परमेश्वर आहात, मी तुमचे स्तुतिगान करेन. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.