वचनदत्त देशास त्या लोकांनी तुच्छ लेखले; त्यांनी दिलेल्या अभिवचनांवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, आणि याहवेहची आज्ञा झिडकारली. तेव्हा परमेश्वराने आपले हात उंचावून शपथ घेतली, की या रानात ते त्यांना नष्ट करतील. त्यांच्या वंशजांना दूरदूरच्या राष्ट्रात पाठवतील, आणि समस्त पृथ्वीवर त्यांना विखरून टाकतील. त्यांनी बआल-पौराची पूजा-अर्चना केली आणि निर्जीव दैवताला यज्ञ अर्पिले. या सर्व दुष्टकर्मांनी त्यांनी याहवेहला क्रुद्ध केले, म्हणून त्यांच्यामध्ये मरी पसरली. तेव्हा फिनहास मध्यस्थ म्हणून उभा राहिला, आणि मग मरी थांबली. फिनहासाच्या या चांगल्या कृत्यामुळे त्याची पिढ्यान् पिढ्या सर्वकाळ नीतिमानात गणना होईल. मरीबाह जलाशयाजवळ देखील त्यांनी याहवेहला राग आणला, आणि त्यांच्यामुळेच मोशेवर संकट आले; परमेश्वराच्या आत्म्याविरुद्ध त्यांनी बंडखोरी केली, आणि मोशे संतापला व अविचारीपणाने बोलला. याहवेहनी तशी आज्ञा केली असूनही, त्यांनी इतर राष्ट्रातील लोकांचा नाश केला नाही. उलट ते अन्य राष्ट्रात मिसळले, आणि त्यांच्या प्रथा आत्मसात केल्या.
स्तोत्रसंहिता 106 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 106:24-35
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ