YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 31:26-31

नीतिसूत्रे 31:26-31 MRCV

तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत. तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते. घरातील प्रत्येक गोष्टींवर तिचे बारकाईने लक्ष असते; आळसाने मिळवलेली भाकर ती कधीही खात नाही. तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात; आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो: “उत्कृष्ट कार्य करणार्‍या अनेक स्त्रिया आहेत, पण त्या सर्वात तू उत्तम आहेस.” मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते, परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते. तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर, आणि तिच्या कार्याबद्दल शहराच्या वेशीजवळ तिची प्रशंसा केली जावो.

नीतिसूत्रे 31 वाचा