YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 29:15-27

नीतिसूत्रे 29:15-27 MRCV

छडी व ताकीद यामुळे ज्ञान मिळते; परंतु बालकाला बेशिस्त सोडल्यास, ते आपल्या आईला कलंकित करते. जेव्हा दुष्टाची भरभराट होते, तेव्हा पापाचीही वाढ होते, परंतु नीतिमान दुष्टांचे पतन पाहतील. तुमच्या बालकांना शिस्त लावा म्हणजे ते तुम्हाला शांती देतील; ते तुम्हाला पाहिजे तो आनंद देतील. जिथे लोकांना दर्शन नाही, तिथे लोक बेबंद असतात. परंतु तो धन्य आहे जो ज्ञानाच्या शिक्षणाकडे लक्ष लावतो. केवळ शब्दांनी नोकर सुधारू शकत नाहीत; जरी त्यांना समजते, तरी ते प्रतिसाद देणार नाहीत. बोलण्यास उतावळा अशा कोणाला तुम्ही पाहिले आहे काय? मूर्खाला त्यांच्यापेक्षा अधिक आशा आहे. ज्या चाकराचा लहानपणापासून लाड होतो, तर मोठेपणी तो उद्धट होईल. क्रोधिष्ट मनुष्य भांडण सुरू करतो, आणि तापट मनुष्य अनेक पापे करतो. अहंकार व्यक्तीच्या अधःपतनाचे कारण ठरतो; परंतु जो आत्म्याने नम्र आहे, त्याला सन्मान मिळतो. चोरांचे साथीदार स्वतःचेच शत्रू आहेत; ते शपथ घेतात आणि सत्य सांगण्याचे धैर्य करत नाहीत. मनुष्याचे भय धोकादायक सापळा असतो, परंतु जो याहवेहवर विश्वास ठेवतो त्याला सुरक्षित ठेवण्यात येते. पुष्कळ लोक राजाची भेट घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु योग्य न्याय याहवेहकडूनच मिळतो. नीतिमान अप्रामाणिक माणसांचा द्वेष करतात; दुष्ट माणसे प्रामाणिक माणसांचा द्वेष करतात.

नीतिसूत्रे 29 वाचा