कोणीही पाठलाग करीत नाही, तरी दुष्ट माणसे पळत असतात; पण नीतिमान सिंहासारखे निर्भय असतात. जेव्हा एखादे राष्ट्र बंडखोर असते, तेव्हा तिथे अनेक शासक असतात, परंतु विवेकशील आणि ज्ञानी शासक सुव्यवस्था कायम ठेवतो. गरीब लोकांवर जुलूम करणारा पुरुष, संपूर्ण पीक वाहून नेणार्या घनघोर वृष्टिसारखा आहे. नियमशास्त्राचा तिरस्कार करणारे दुर्जनांची स्तुती करतात, परंतु ते पालन करणारे, त्यांचा विरोध करतात. योग्य ते काय आहे हे दुष्टकर्म करणाऱ्यांना समजत नाही, परंतु जे याहवेहचा शोध घेतात, त्यांना ते पूर्णपणे समजते. विकृत मार्गावर चालणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा प्रामाणिकपणाने चालणारा गरीब मनुष्य बरा. सुज्ञ पुत्र शिक्षणाकडे लक्ष लावतो, परंतु खादाडांची संगत करणारा पुत्र त्याच्या वडिलांचा अब्रू घालवितो. जो गरिबांकडून व्याज किंवा फायदा घेऊन संपत्ती वाढवितो, ती दुसर्याकरिता साठवितो, जो गरिबांवर दया दाखवेल. जर कोणी माझ्या नियमशास्त्राकडे कानाडोळा केला, तर त्यांच्या प्रार्थनासुद्धा तिरस्करणीय वाटतात. जे कोणी नीतिमानाला वाईट मार्गाकडे घेऊन जातात, ते स्वतःच्याच जाळ्यात सापडतील, परंतु निर्दोष माणसांना उत्तम वारसा मिळेल. श्रीमंत माणसे त्यांच्या दृष्टीने स्वतःला शहाणे समजतात; परंतु जो गरीब आणि विवेकी आहे तो पाहतो की श्रीमंत कसे भ्रमात पडलेले आहेत. नीतिमान यशस्वी झाला तर हर्षोल्हास केला जातो; पण दुष्ट प्रबल झाले असता लोक स्वतःस लपवून ठेवतात. जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही, परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते. परमेश्वराबद्दल नेहमी भय बाळगणारा मनुष्य धन्य, परंतु मन कठोर करणारा संकटात सापडतो.
नीतिसूत्रे 28 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 28:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ