याहवेह बलामाला भेटले व त्याच्या मुखात आपला शब्द घातला व म्हटले, “बालाकाकडे परत जा आणि त्याला हे संदेश दे.” जेव्हा तो परत आला तेव्हा तो आपल्या मोआबी सरदारांबरोबर त्याच्या होमार्पणाजवळ उभा असलेला त्याला दिसला. बालाकाने त्याला विचारले, “याहवेह काय म्हणाले?” नंतर त्याने हा संदेश सांगितला: “बालाका, ऊठ आणि ऐक; सिप्पोरच्या पुत्रा, माझे ऐक. परमेश्वर मनुष्य नाहीत की त्यांनी लबाडी करावी, ते मानव नाहीत, की त्यांनी आपले मन बदलावे. याहवेह बोलणार आणि त्यानुसार करणार नाहीत काय? त्यांनी अभिवचन दिले आणि ते पूर्ण करणार नाहीत काय? आशीर्वाद देण्याची आज्ञा मला मिळाली आहे; याहवेहने आशीर्वाद दिला आहे आणि मी तो बदलू शकत नाही. “याकोबात विपत्ती सापडली नाही, इस्राएलात क्लेश दिसत नाहीत. त्यांचे परमेश्वर याहवेह त्यांच्याबरोबर आहेत; राजाचा जयघोष त्यांच्यामध्ये आहे. परमेश्वराने त्यांना इजिप्तच्या बाहेर आणले. रानबैलासारखे त्यांचे बळ आहे. याकोबाविरुद्ध मंत्रतंत्र नाही, इस्राएलविरुद्ध अपशकुन नाही. याकोबाविषयी व इस्राएलाविषयी असे म्हटले जाईल, परमेश्वराने काय केले आहे ते पाहा! लोक सिंहिणीप्रमाणे उठतात; ते सिंहासारखे उभे राहतात जे त्याची शिकार खाईपर्यंत व वधलेल्यांचे रक्त पिईपर्यंत विसावा घेत नाहीत.” मग बालाक बलामाला म्हणाला, “त्यांना अजिबात शापही देऊ नकोस किंवा आशीर्वादही देऊ नकोस.” बलामाने बालाकाला उत्तर दिले, “याहवेह जे सांगतील त्याचप्रमाणे मी केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?” नंतर बालाक बलामाला म्हणाला, “चल, मी तुला आणखी एका ठिकाणी नेतो. कदाचित त्या ठिकाणाहून तू माझ्यासाठी त्यांना शाप द्यावा हे परमेश्वराला बरे वाटेल.” आणि बालाकाने बलामाला पेओर डोंगराच्या शिखराकडे ओसाड जागेसमोर नेले. बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि सात गोर्हे व सात मेंढे माझ्यासाठी तयार ठेव.” बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने केले आणि प्रत्येक वेदीवर एकएक गोर्हा व मेंढा अर्पण केला.
गणना 23 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 23:16-30
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ