YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 21:1-7

गणना 21:1-7 MRCV

इस्राएली लोक अथारीमच्या वाटेने येत आहेत असे नेगेवमध्ये राहत असलेला कनानी राजा अरादने जेव्हा ऐकले, तेव्हा त्याने इस्राएली लोकांवर हल्ला केला व काहींना कैद केले. तेव्हा इस्राएलने याहवेहपुढे ही शपथ घेतली: “जर तुम्ही या लोकांना आमच्या हाती दिले तर आम्ही त्यांची शहरे पूर्णपणे नाश करू.” याहवेहने इस्राएली लोकांची विनंती ऐकली आणि कनानी लोकांना त्यांच्या हाती दिले. त्यांनी त्यांचा व त्यांच्या नगरांचा पूर्णपणे नाश केला; म्हणून त्या ठिकाणाचे नाव होरमाह असे पडले. नंतर इस्राएली लोक होर पर्वताकडून प्रवास करीत एदोमाला वळसा घालून तांबड्या समुद्राच्या वाटेने प्रवास करीत निघाले; परंतु लोक वाटेतच अधीर झाले; ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.” तेव्हा याहवेहने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठविले; ते लोकांना चावले आणि पुष्कळ इस्राएली लोक मरण पावले. लोक मोशेकडे आले व म्हणाले, “याहवेहविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केले आहे. याहवेहने हे साप आमच्यापासून दूर घालवून द्यावे म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.

गणना 21 वाचा