यावर येशू म्हणाले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” त्यांनी विचारले, “इतक्या लोकांना जेवू घालावयाचे म्हणजे अर्ध्या वर्षाच्या मजुरी पेक्षा अधिक रक्कम खर्च करावी काय?” ते म्हणाले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जा आणि पाहा.” जेव्हा त्यांनी शोधले तेव्हा त्यांना कळले व ते म्हणाले, “पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” मग येशूंनी लोकांना गवतावर गटागटाने बसावयास सांगितले. त्याप्रमाणे लोक पन्नास आणि शंभर अशा गटांनी बसले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरीचे तुकडे करून ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले आणि दोन मासळ्यांचेही असेच वाटप केले. ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले, आणि शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या उचलल्या. तिथे जेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती.
मार्क 6 वाचा
ऐका मार्क 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 6:37-44
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ