YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14:43-52

मार्क 14:43-52 MRCV

ते बोलत आहेत तेव्हाच, त्यांच्या बारा शिष्यांपैकी एक यहूदा, महायाजकांनी आणि वडीलजनांनी पाठविलेल्या तरवारी आणि सोटे धारण करणार्‍या जमावाला बरोबर घेऊन पुढे आला. आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.” तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले. त्या पुरुषांनी येशूंना धरले आणि अटक केले. पण तेवढ्यात जे उभे होते त्यांच्यातील एकाने तरवार उपसून महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा कान कापून टाकला. येशूंनी विचारले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, की तुम्ही तरवारी आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु धर्मशास्त्र पूर्ण झाले पाहिजे.” मग सर्वजण त्यांना सोडून पळून गेले. मात्र, तागाच्या वस्त्राशिवाय अंगावर काहीही न पांघरलेला एक तरुण येशूंच्या मागे चालला होता. जमावाने त्यालाही धरण्याचा प्रयत्न केला, परंतु आपले वस्त्र सोडून तो तसाच उघडा पळून गेला.