संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर तिथे आले, ते सर्व मेजाभोवती बसून भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल—तो माझ्याबरोबर पंक्तीला बसून जेवत आहे.” ते दुःखाने भरून गेले आणि एकामागून एक त्यांना विचारू लागले, “खरोखर तो मी तर नाही ना?” “तो तुम्हा बाराजणांपैकी एक आहे.” त्यांनी उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे. कारण त्यांच्याबद्दल लिहिले होते त्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.” भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली, तिच्यावर आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत ते म्हणाले, “ही घ्या, हे माझे शरीर आहे.” त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला आणि मग ते सर्व त्यातून प्याले. मग येशू त्यांना म्हणाले, “हे माझ्या कराराचे रक्त आहे व ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे मी तुम्हाला निश्चित सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.” मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले.
मार्क 14 वाचा
ऐका मार्क 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 14:17-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ