मार्क 11:27, 28, 29, 30, 31, 32, 33
मार्क 11:27 MRCV
ते परत यरुशलेमला आले, तेव्हा येशू मंदिराच्या आवारात चालत असता, मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले.
मार्क 11:28 MRCV
“कोणत्या अधिकाराने या गोष्टी तुम्ही करत आहात? व तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” असे त्यांना विचारू लागले.
मार्क 11:29 MRCV
येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर द्या आणि मी हे कोणत्या अधिकाराने करत आहे, हे मी तुम्हाला सांगेन.
मार्क 11:31 MRCV
या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली, “योहानाचा बाप्तिस्मा ‘स्वर्गापासून होता’ असे जर आपण म्हणालो तर तो विचारील ‘मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?’
मार्क 11:32 MRCV
पण जर आपण म्हणालो, ‘मनुष्यांपासून होता,’ ” त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण योहान संदेष्टा होता असे प्रत्येकजण मानत होता.
मार्क 11:33 MRCV
शेवटी त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला माहीत नाही.” यावर येशू त्यांना म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो, हे तुम्हाला सांगणार नाही.”