येशूंनी कफर्णहूममध्ये प्रवेश केला. तेव्हा एका रोमी शताधिपतीने त्यांच्याकडे येऊन त्यांना विनंती केली, “प्रभू, माझा नोकर घरी पक्षघाताने आजारी असून वेदनांनी तळमळत आहे.” येशूने त्याला म्हटले, “मी त्याला येऊन बरे करू का?” तेव्हा तो शताधिपती म्हणाला, “महाराज, तुम्ही माझ्या छप्पराखाली यावे यास मी योग्य नाही, शब्द मात्र बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. कारण मी स्वतः अधिकाराच्या अधीन असलेला मनुष्य असून, माझ्या अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्याला ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला ‘हे कर,’ अथवा ‘ते कर,’ असे म्हटले तर तो ते करतो.” येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि समुदायाला म्हणाले, “मी तुम्हाला सत्य सांगतो की, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलातील कोणामध्येही आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की, अनेकजण पूर्व आणि पश्चिमेकडून येतील, आणि स्वर्गीय राज्यात चाललेल्या मेजवानीत, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर आपल्या जागा घेतील.
मत्तय 8 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 8:5-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ