YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 5:21-26

मत्तय 5:21-26 MRCV

“ ‘तू खून करू नको, आणि जो कोणी खून करील तो न्यायास पात्र ठरेल,’ असे प्राचीन काळाच्या लोकांना सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे. पण मी सांगतो की, तुम्ही बहीण किंवा भावावर रागवाल, तर तुम्ही न्यायदंडास पात्र व्हाल, जो कोणी त्यांना मूर्ख ‘राका,’ असे म्हणेल, तर त्याला न्यायालयासमोर उत्तर द्यावे लागेल. पण जो कोणी ‘तू मूर्ख’ असे म्हणेल तर त्याला नरकाच्या अग्नीत टाकले जाण्याची भीती आहे. “यास्तव, जर तुम्ही वेदीवर भेट अर्पण करीत आहात आणि तेथे तुम्हाला आठवले की, तुझ्या बंधू किंवा भगिनीच्या मनात तुमच्याविरुद्ध काही आहे, तर तुमची भेट तेथेच वेदीपुढे ठेवा. पहिले जाऊन त्यांच्याबरोबर समेट करा आणि मग येऊन आपली भेट अर्पण करा. “तुमच्या शत्रूने तुम्हाला न्यायालयात नेण्यापूर्वीच, तुम्ही त्याच्याबरोबर वाटेत असतानाच लवकर त्याच्याशी संबंध नीट करा. नाही तर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाच्या स्वाधीन करेल आणि न्यायाधीश तुम्हाला शिपायांच्या स्वाधीन करील आणि तुम्हाला तुरुंगात टाकेल. मी तुम्हाला निश्चित सांगतो की प्रत्येक दमडी चुकती केल्याशिवाय तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही.

मत्तय 5 वाचा