YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 5:1-11

मत्तय 5:1-11 MRCV

लोकांची गर्दी पाहून, येशू टेकडीवर गेले आणि तेथे बसले. त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले. मग ते त्यांना शिकवू लागले. ते म्हणाले: “धन्य ते, जे आत्म्याने नम्र आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. धन्य ते, जे शोकग्रस्त आहेत, कारण त्यांना सांत्वन मिळेल. धन्य ते, जे सौम्य आहेत, कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी होतील. ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे ते धन्य कारण ते तृप्त केले जातील. धन्य ते, जे दयाळू आहेत, कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल. धन्य ते, जे शुद्ध हृदयाचे आहेत, कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल. धन्य ते, जे शांती प्रस्थापित करतात, कारण ते परमेश्वराचे लोक म्हणून ओळखण्यात येतील. धन्य ते, ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ करण्यात येतो, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. “माझे अनुयायी असल्या कारणाने लोक तुमची निंदा, तुमचा अपमान व छळ करतील व तुमच्याविरुद्ध सर्वप्रकारच्या गोष्टी लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य.

मत्तय 5 वाचा