येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर त्यांची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली. मग क्रूसावर टांगलेल्या येशूंवर पहारा करीत ते जवळच बसले. त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला दोषपत्राचा लेख लावण्यात आला होता, त्यावर लिहिले होते: हा येशू, यहूद्यांचा राजा आहे. त्यांनी दोन बंडखोरांना त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळले, एक उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. जे जवळून जात होते त्यांनी त्यांचा अपमान केला, ते डोकी हालवीत म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना! जर तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव.” त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक यांनीही त्यांची थट्टा केली. ते म्हणाले, “त्याने दुसर्यांचे तारण केले, पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. तो इस्राएलाचा राजा आहे! मग त्याला क्रूसावरून खाली उतरून येऊ दे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. तो परमेश्वरावर भरवसा ठेवतो. मग परमेश्वराची इच्छा असल्यास त्याने त्याची सुटका करावी, कारण तो म्हणाला होता की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे.’ ” त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्या त्या चोरांनीही त्यांचा अपमान केला.
मत्तय 27 वाचा
ऐका मत्तय 27
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 27:35-44
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ