YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 23:23-28

मत्तय 23:23-28 MRCV

“तुम्हा परूश्यांचा व नियमशास्त्र शिक्षकांचा धिक्कार असो, अहो ढोंग्यांनो! तुम्ही पुदिना, बडीशेप आणि जिरे या मसाल्यांचा दशांश देता, परंतु न्याय, दया आणि विश्वासूपणा या अत्यंत महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता. या गोष्टी तर तुम्ही कराव्‍यात, पण त्याचबरोबरच ज्या अधिक महत्वाच्या गोष्टी आहेत त्या दुर्लक्षित करू नये. तुम्ही आंधळे मार्गदर्शक! तुम्ही एक चिलट गाळून काढता पण उंट गिळून टाकता. “तुम्हा परूश्यांचा आणि नियमशास्त्र शिक्षकांचा धिक्कार असो, अहो ढोंग्यांनो! तुम्ही आपली ताटवाटी बाहेरून घासून पुसून स्वच्छ करता पण अंतर्भाग लोभ आणि असंयम यांनी भरलेला आहे. आंधळ्या परूश्यांनो! पहिल्यांदा ताटवाटी आतून स्वच्छ करा म्हणजे ती बाहेरून देखील स्वच्छ होतील. “अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो; कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांप्रमाणे आहात. त्या बाहेरून सुंदर दिसतात, पण आत मृतांच्या हाडांनी व सर्वप्रकारच्या अशुद्धतेने व दुष्कृत्याने भरलेल्या असतात. त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, पण आतून तुम्ही कबरांसारखे आहात, तुम्ही ढोंगाने आणि दुष्कृत्याने भरलेले आहात.

मत्तय 23 वाचा