YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 21:1-11

मत्तय 21:1-11 MRCV

ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले, त्यांना म्हणाले, “समोरच्या गावात जा, तिथे पोहोचताच, तुम्हाला एक गाढवी दिसेल, तिच्याजवळ शिंगरू बांधून ठेवलेले असेल; त्यांना सोडून माझ्याकडे आणा. कोणी तुम्हाला विचारले, तर त्यांना एवढेच सांगा, प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लागलीच पाठवून देतील.” संदेष्ट्याने केलेले भविष्यकथन पूर्ण व्हावे म्हणून असे झाले: “सीयोनकन्येला सांगा की, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो लीन आहे व गाढवीवर बसून येत आहे, आणि गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे.” शिष्य गेले आणि येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी केले. त्यांनी गाढवी व शिंगरू आणली आणि त्यांचे वस्त्रे गाढवी व शिंगरूच्या पाठीवर टाकले मग येशू त्यावर बसले. गर्दीतील काही लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले; तर इतर काहींनी झाडांच्या डाहळ्या तोडून रस्त्यावर पसरल्या. मग जमावातील जे लोक त्यांच्यापुढे गेलेले आणि जे त्यांच्यामागून चालले, ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.” “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!” येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा सर्व शहर जागे झाले आणि त्यांनी विचारले, “हा कोण आहे?” “हे येशू आहेत!” गर्दीतील लोकांनी उत्तर दिले, “गालीलाच्या नासरेथहून आलेले संदेष्टा आहेत.”