YouVersion Logo
Search Icon

मत्तय 16:21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28

मत्तय 16:21 MRCV

तेव्हापासून, येशू आपल्या शिष्यांना सांगू लागले की त्यांनी यरुशलेमास जाणे, वडील व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून अनेक दुःख सहन करावी, जिवे मारले जावे आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा जिवंत होणे याविषयी अगत्य आहे.

मत्तय 16:22 MRCV

पेत्र त्यांना बाजूला घेऊन त्यांचा निषेध करू लागला व म्हणाला, “प्रभुजी, असे तुम्हाला कधीच होणार नाही.”

मत्तय 16:23 MRCV

तेव्हा येशू पेत्राकडे वळून म्हणाले, “अरे सैताना, माझ्या दृष्टीआड हो! तू मला अडखळण आहे. तुझे मन परमेश्वराच्या गोष्टींकडे नाही, परंतु केवळ मनुष्याच्या गोष्टींकडे आहे.”

मत्तय 16:24 MRCV

मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्यांनी स्वतःस नाकारावे, रोज आपला क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे.

मत्तय 16:25 MRCV

कारण जो कोणी आपला जीव वाचवेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल.

मत्तय 16:26 MRCV

कोणी सारे जग मिळविले आणि आपला आत्मा गमावला तर त्यातून काय चांगले निष्पन्न होणार? आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का?

मत्तय 16:27 MRCV

कारण, मानवपुत्र आपल्या पित्याच्या वैभवानिशी त्यांच्या दिव्य दूतांबरोबर येईल, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईल.

मत्तय 16:28 MRCV

“मी तुम्हाला निश्चित सांगतो, की येथे उभे असणारे काहीजण असे आहेत की, ते मानवपुत्राला त्यांच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत, त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही.”