“शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही किंवा दास आपल्या धन्यापेक्षा श्रेष्ठ नाही. शिष्याने आपल्या गुरू सारखे असणे आणि दासाने आपल्या धन्यासारखे असणे पुरे आहे. जर घर प्रमुखाला बालजबूल म्हटले, तर घरच्या सभासदांना कितीतरी अधिक म्हणतील! “तुम्ही त्यांना भिऊ नका, जे प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. आता मी तुम्हाला अंधारात सांगत आहे ते दिवसाच्या प्रकाशात सांगा; जे मी तुमच्या कानात सांगत आहे ते घराच्या धाब्यावरून जाहीर करा. जे तुमच्या शरीराचा वध करू शकतात परंतु आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, अशांना भिऊ नका. तर तुमचा आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकामध्ये जे नाश करू शकतात त्या परमेश्वराचे मात्र भय धरा. एका पैशात दोन चिमण्या विकत मिळतात, तरी त्यापैकी एकही चिमणी तुमच्या पित्याच्या इच्छेविना जमिनीवर पडत नाही. आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. म्हणून भीती बाळगू नका, कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात. “जो कोणी मला जाहीरपणे स्वीकारेल, तर मीही त्याचा माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे स्वीकार करीन. तरी जे मला येथे लोकांसमोर नाकारतात, तर मीही त्यांना माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे नाकारीन. “मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे अशी कल्पना करू नका. शांती देण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यास आलो आहे. “ ‘पुत्राला आपल्या पित्याविरुद्ध, मुलीला आपल्या आईविरुद्ध, आणि सूनेला तिच्या सासूविरुद्ध करण्यासाठी मी आलो आहे. एखाद्या मनुष्याच्या स्वतःच्या घरातीलच लोक त्याचे शत्रू होतील.’ “जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आईवडिलांवर अधिक प्रेम करीत असेल, तर तो मला पात्र नाही; जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या पुत्र व कन्यांवर अधिक प्रेम करीत असेल तर ते मला पात्र नाही. जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला पात्र नाही. जो आपल्या जीवाला जपतो, तो आपला जीव गमावील आणि जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो, तो आपला जीव सुरक्षित राखील. “जे तुमचे स्वागत करतात, ते माझे स्वागत करतात आणि जे माझे स्वागत करतात, ते ज्यांनी मला पाठविले त्यांचे स्वागत करतात. जो संदेष्ट्यांचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो, त्याला संदेष्ट्यांचे प्रतिफळ मिळेल; जो कोणी नीतिमान मनुष्याचा स्वीकार नीतिमान आहे म्हणून करतो, त्याला नीतिमान मनुष्याचे प्रतिफळ मिळेल. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या लहानातील एकाला जो माझा शिष्य आहे त्याला पेलाभर थंड पाणी प्यावयास दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.”
मत्तय 10 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 10:24-42
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ