YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 2:25-33

लूक 2:25-33 MRCV

यरुशलेम येथे शिमोन नावाचा एक मनुष्य होता, तो नीतिमान आणि भक्तिमान होता. इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असून पवित्र आत्मा त्याजवर होता. कारण प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. पवित्र आत्म्याने प्रवृत्त होऊन तो मंदिराच्या परिसरात गेला. तेव्हा आईवडिलांनी नियमशास्त्रात सांगितलेला विधी पूर्ण करण्यासाठी येशू बाळाला मंदिरात आणले, तेव्हा शिमोनाने बाळाला त्याच्या हातात घेतले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हटले: “हे सर्वशक्तिमान प्रभू, तुझ्या वचनाप्रमाणे आता तुझ्या सेवकाला शांतीने घेऊन जावे. मी तुझे तारण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. जे तू सर्व राष्ट्रांच्या नजरेसमोर सिद्ध केले आहेस, ते गैरयहूदीयांसाठी प्रकटीकरणाचा प्रकाश, आणि आपल्या इस्राएल लोकांचे गौरव असे आहे.” त्यांच्याविषयीचे हे बोलणे ऐकून योसेफ आणि मरीया आश्चर्यचकित झाले.

लूक 2 वाचा