लूक 19:45, 46, 47, 48
लूक 19:45 MRCV
नंतर येशू मंदिराच्या परिसरात आले आणि तेथे विक्री करणार्यास बाहेर घालवून देऊ लागले.
लूक 19:46 MRCV
ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, ‘माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल’; पण तुम्ही ‘लुटारूंची गुहा केली आहे.’”
लूक 19:47 MRCV
त्यानंतर येशू मंदिराच्या आवारात दररोज शिक्षण देऊ लागले. परंतु प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षक व वडीलजन त्यांना ठार मारण्याचा बेत करीत होते.
लूक 19:48 MRCV
परंतु त्यांना कोणताही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक येशूंचे मन लावून ऐकत होते.