YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 15:11-19

लूक 15:11-19 MRCV

येशू पुढे म्हणाले, “एका मनुष्याला दोन पुत्र होते. त्यातला धाकटा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेतील माझा वाटा मला द्या’ त्यावेळी त्याच्या वडिलांनी आपली मालमत्ता त्यांच्यामध्ये वाटून दिली. “काही दिवस झाले नाही तोच, धाकट्या पुत्राने सर्वकाही जमा केले व दूर देशी निघून गेला तेथे आपला सर्व पैसा चैनबाजीत उधळून टाकला. सर्वकाही खर्च करून झाल्यानंतर, त्या संपूर्ण देशामध्ये कडक दुष्काळ पडला आणि त्याला गरज भासू लागली. तेव्हा तो गेला आणि स्वतःला मजुरीवर घेण्यासाठी त्या देशातील एका नागरिकाकडे गेला, त्याने त्याला त्याच्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. शेवटी आपले पोट भरण्यासाठी, डुकरे खात असलेल्या शेंगा खाव्या असे त्याला वाटले, कारण त्याला कोणीच काही दिले नव्हते. “शेवटी तो शुद्धीवर आला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या बापाच्या घरी नोकर चाकरांनाही पुरून उरेल इतके अन्न असते, पण मी मात्र इकडे उपाशी मरत आहे. मी आता माझ्या बापाकडे जाईन आणि म्हणेन: बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा पुत्र म्हणवून घेण्‍यास लायक राहिलो नाही; मला एका चाकरांसारखे ठेवा.’

लूक 15 वाचा