YouVersion Logo
Search Icon

लूक 15:1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10

लूक 15:1 MRCV

आता जकातदार आणि अनेक पापी येशूंचे उपदेश ऐकण्यासाठी आले होते.

लूक 15:2 MRCV

हे पाहून परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक तक्रार करू लागले, “येशू पापी लोकांचे स्वागत करतात आणि त्यांच्या पंक्तीस बसून जेवतात.”

लूक 15:3 MRCV

त्यावेळी येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला

लूक 15:4 MRCV

“समजा, एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर नव्याण्णव रानात सोडून हरवलेले मेंढरू सापडेपर्यंत त्याला शोधणार नाही काय?

लूक 15:5 MRCV

ते सापडल्यावर तो त्याला आनंदाने आपल्या खांद्यावर उचलून घेईल

लूक 15:6 MRCV

आणि घरी येईल. आपल्या मित्रांना आणि शेजार्‍यांना बोलावून म्हणेल, ‘मजबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे.’

लूक 15:7 MRCV

त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की ज्या नव्याण्णव नीतिमान लोकांना पश्चात्तापाची गरज नाही, त्यांच्यापेक्षा पश्चात्ताप करणार्‍या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो.

लूक 15:8 MRCV

“एका स्त्री जवळ चांदीची दहा नाणी असून त्यातील एक हरवले, तर ती दिवा लावून, घर झाडून ते सापडेपर्यंत त्याचा शोध करणार नाही काय?

लूक 15:9 MRCV

ते तिला सापडल्यावर, आपल्या मैत्रिणींना आणि शेजार्‍यांना बोलावून म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा, कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’

लूक 15:10 MRCV

त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्‍या एका पाप्याबद्दल परमेश्वराच्या दूतांच्या समक्षतेत आनंद केला जातो.”