तेव्हा जखर्याच्या समोर प्रभुचा एक दूत प्रगट झाला, तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिला. जेव्हा जखर्याने त्याला पाहिले तो चकित झाला आणि भयभीत झाला. पण देवदूत त्याला म्हणाला, “जखर्या भिऊ नकोस, कारण परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझी पत्नी अलीशिबा तुझ्यासाठी एक पुत्र प्रसवेल आणि तू त्याला योहान असे म्हणावे. तो तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्मामुळे अनेकांना हर्ष वाटेल. तो प्रभुच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल. तो अनेक इस्राएल लोकांना आपल्या प्रभुपरमेश्वराकडे परत घेऊन येईल. तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने प्रभुच्या पुढे चालेल, आईवडिलांची हृदये त्यांच्या लेकरांकडे वळविल व अवज्ञा करणार्यांना नीतिमान लोकांच्या ज्ञानाकडे वळविल व लोकांना प्रभुच्या मार्गाप्रमाणे चालण्यासाठी तयार करील.”
लूक 1 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 1:11-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ