YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशुआ 14:6-14

यहोशुआ 14:6-14 MRCV

यहूदाह वंशाचे लोक गिलगाल येथे यहोशुआकडे आले. आणि कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब त्याला म्हणाला, “कादेश-बरनेआमध्ये याहवेहने परमेश्वराचा सेवक मोशेला तुझ्या व माझ्याविषयी काय सांगितले हे तुला माहीत आहे. जेव्हा याहवेहचा सेवक मोशेने मला कादेश-बरनेआवरून हा देश हेरण्यासाठी पाठविले होते तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो. आणि मला मनापासून जे वाटले त्याप्रमाणे मी त्याला वर्तमान दिले, परंतु माझ्याबरोबर गेलेल्या माझ्या इस्राएली बांधवांनी लोकांचे अंतःकरण भयभीत केले. तरीही मी, याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले, म्हणून त्या दिवशी मोशेने मला शपथ घेऊन सांगितले, ‘देशाच्या ज्या भागात तुझे पाऊल पडेल तो भाग तुझा आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे वतन होईल, कारण तू याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले आहे.’ “इस्राएली लोक रानात फिरत असता याहवेहने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आजपर्यंत पंचेचाळीस वर्षे याहवेहने मला जिवंत ठेवले आहे आणि आज मी पंचाऐंशी वर्षांचा आहे! मोशेने मला पाठविले होते, त्या दिवशी मी जेवढा बलवान होतो तेवढाच आज देखील आहे आणि तेव्हा युद्धावर जाण्यास मी जसा आवेशी होतो तसाच आज देखील आहे. म्हणून त्या दिवशी याहवेहने हा डोंगराळ प्रदेश मला देण्याचे अभिवचन दिले होते, तो तू मला दे. तुला तर माहीतच आहे की, तिथे अनाकी लोक राहतात आणि त्यांची शहरे मोठी व तटबंदीची आहेत, परंतु याहवेह जर माझ्याबरोबर असतील, तर मी त्या लोकांना घालवून देईन.” तेव्हा यहोशुआने यफुन्नेहचा पुत्र कालेबाला आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन त्याचे वतन म्हणून दिले. म्हणून तेव्हापासून हेब्रोन हे कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेबच्या मालकीचे वतन झाले, कारण त्याने याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले.

यहोशुआ 14 वाचा