यार्देन नदीच्या पूर्वेकडे आर्णोन खोर्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत व पूर्वेकडील सर्व अराबासह ज्या राजांना इस्राएली लोकांनी पराभूत करून ज्यांच्या सीमा हस्तगत केल्या ते हे: हेशबोन येथे राज्य करणारा अमोर्यांचा राजा सीहोन. त्याच्या राज्याचा विस्तार आर्णोन खोर्याच्या कडेवरील अरोएर शहरापासून आणि आर्णोन खोर्याच्या मध्यभागापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत होता. यामध्ये अर्ध्या गिलआदाचा समावेश होता. अराबाच्या पूर्वेकडील भागावर सुद्धा त्याने राज्य केले, तसेच किन्नेरेथ समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र), बेथ-यशिमोथपर्यंत आणि दक्षिणेकडे पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंत राज्य केले. बाशानचा राजा ओग, जो रेफाईम लोकांपैकी शेवटचा होता, त्याने अष्टारोथ व एद्रेई येथे राज्य केले. त्याचे राज्य हर्मोन पर्वत, सलेकाह, संपूर्ण बाशानपासून गशूरी आणि माकाथी लोकांच्या सीमेपर्यंत, अर्ध्या गिलआद पासून हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत विस्तृत होते. याहवेहचा सेवक मोशे व इस्राएलच्या लोकांनी या लोकांवर विजय मिळविला आणि याहवेहचा सेवक मोशेने त्यांचा देश रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून दिला होता.
यहोशुआ 12 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहोशुआ 12:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ