YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योना 1:11-17

योना 1:11-17 MRCV

मग त्यांनी योनाहला विचारले, “आम्ही तुझ्यासोबत काय करावे जेणेकरून समुद्र आमच्यासाठी शांत होईल?” कारण समुद्र तर अधिकाधिक उग्र होत होता. तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मला समुद्रात फेकून द्या, म्हणजे समुद्र पुन्हा शांत होईल. कारण माझ्या चुकीमुळेच हे भयंकर वादळ तुमच्यावर आले आहे, हे मला ठाऊक आहे.” तरीही खलाश्यांनी जहाज किनाऱ्यावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत, कारण समुद्र पूर्वीपेक्षा जास्त उग्र होत होता. मग ते मोठ्या आवाजात याहवेहचा धावा करत म्हणाले, “याहवेह, कृपया या मनुष्याचा जीव घेतल्याने आमचा नाश होऊ देऊ नका. एका निरपराध व्यक्तीला मारल्याबद्दल आम्हाला दोष देऊ नका, कारण तुम्हाला जे आवडले ते तुम्ही केले आहे.” मग त्यांनी योनाहला उचलले आणि जहाजावरून समुद्रात फेकून दिले, आणि उग्र समुद्र तत्काळ शांत झाला! यामुळे त्या लोकांना याहवेहची भीती वाटली आणि त्यांनी याहवेहला यज्ञ केला आणि नवस केला. याहवेहने एक मोठा मासा नेमला ज्याने योनाहला गिळंकृत केले आणि योनाह त्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला.

योना 1 वाचा