हे ऐकल्यावर अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. ज्या यहूदी पुढार्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, “जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल. मग तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करील.” त्यांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर आम्हाला स्वतंत्र करण्यात येईल, असे तुम्ही कसे म्हणता?” त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला खरोखर सांगतो की, जो प्रत्येकजण पाप करतो तो पापाचा दास आहे. आता दासाला कुटुंबात कायम राहता येत नाही, परंतु पुत्र तेथे सदासर्वदा राहतो. म्हणून पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केले, तरच तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल.
योहान 8 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 8:30-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ