YouVersion Logo
Search Icon

योहान 7:45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53

योहान 7:45 MRCV

शेवटी मंदिराचे शिपायी प्रमुख याजक व परूशी यांच्याकडे परत आले, त्यांनी विचारले, “तुम्ही त्याला आत का आणले नाही?”

योहान 7:46 MRCV

शिपाई उत्तर देत म्हणाले, “या मनुष्यासारखे आतापर्यंत कोणीही बोलले नाही.”

योहान 7:47 MRCV

त्यावर उलट उत्तर देत परूशी म्हणाले, “तुम्हालाही त्याने फसवले आहे काय?”

योहान 7:48 MRCV

अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय?

योहान 7:49 MRCV

नाही! परंतु हा समुदाय ज्यांना नियमशास्त्राविषयी माहिती नाही—तो शापित आहे.

योहान 7:50 MRCV

निकदेम, हा त्यांच्यापैकी एक असून, जो पूर्वी येशूंकडे गेला होता, म्हणाला

योहान 7:51 MRCV

“एखाद्याचे प्रथम न ऐकता व जे कार्य तो करत आहे ते समजून न घेता नियमशास्त्र त्याला दोषी ठरविते काय?”

योहान 7:52 MRCV

त्यावर त्यांनी उत्तर दिले, “तुम्हीदेखील गालीलकर आहात काय? शोधून पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की गालीलातून कोणताही संदेष्टा येत नाही.”

योहान 7:53 MRCV

नंतर ते सर्वजण घरी गेले.