योहान 6:61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71
योहान 6:61 MRCV
त्यांचे शिष्य कुरकुर करीत आहेत, हे ओळखून येशू त्यांना म्हणाले, “यामुळे तुम्ही दुखविले गेले आहात का?
योहान 6:63 MRCV
फक्त आत्माच सार्वकालिक जीवन देतो; देहाचे काही महत्व नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन यांनी पूर्ण आहेत.
योहान 6:64 MRCV
तरी, तुमच्यापैकी काहीजण माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.” आपणावर कोण विश्वास ठेवतो व कोण आपला विश्वासघात करणार हे येशूंना सुरुवातीपासून माहीत होते.
योहान 6:65 MRCV
पुढे येशू म्हणाले, “यासाठीच मी तुम्हाला सांगितले होते की, पित्याने शक्य केल्याशिवाय कोणालाही माझ्याकडे येता येत नाही.”
योहान 6:68 MRCV
त्यावर शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत.
योहान 6:69 MRCV
आम्ही विश्वास ठेवला आहे आणि परमेश्वराचे पवित्र ते तुम्हीच आहात हे ओळखले आहे.”
योहान 6:70 MRCV
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बाराजणांस निवडून घेतले नव्हते काय? तरी तुम्हातील एकजण सैतान आहे!”
योहान 6:71 MRCV
हे तर ते शिमोन इस्कर्योत याचा पुत्र यहूदा याच्यासंबंधात बोलले, कारण तो बारा शिष्यांपैकी एक असून, त्यांचा विश्वासघात करणार होता.