मग काठावर उतरल्यावर, त्यांनी कोळशाचा विस्तव पाहिला, त्यावर मासळी व काही भाकरी ठेवल्या होत्या. येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीतून काही आणा.” शिमोन पेत्राने परत मचव्यावर चढून जाळे काठावर ओढून आणले. त्याने मोजल्याप्रमाणे त्यात एकशे त्रेपन्न मोठे मासे होते आणि इतके असूनही ते जाळे फाटले नव्हते. येशू त्यांना म्हणाले, “या आणि न्याहरी करा.” आपण कोण आहात? असे विचारण्याचे त्यांच्या शिष्यांपैकी एकालाही धैर्य झाले नाही, परंतु ते प्रभू आहे हे त्यांना माहीत होते. मग येशू आले, त्यांनी भाकर घेऊन त्यांना दिली व मासळीचेही त्यांनी तसेच केले.
योहान 21 वाचा
ऐका योहान 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 21:9-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
YouVersion तुमच्या अनुभवाला वैयक्तिकृत करण्यासाठी कुकीज वापरते. आमची वेबसाइट वापरून, तुम्ही आमच्या कुकीजचा वापर करता आमच्या गोपनीयता धोरणात वर्णन केल्याप्रमाणे
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ