तिथे त्यांना आणि त्यांच्याबरोबर इतर दोघांना—त्यांच्या दोन्ही बाजूला एकएक व येशूंना त्यांच्यामध्ये असे क्रूसावर खिळले. पिलाताने त्यांच्या क्रूसावर एक लेखपत्रक लावले, ते असे होते: यहूद्यांचा राजा, नासरेथकर येशू. अनेक यहूद्यांनी हे पत्रक वाचले, कारण येशूंना ज्या ठिकाणी क्रूसावर खिळले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते आणि क्रूसावरील लेख हा हिब्रू, लॅटिन व ग्रीक भाषांमध्ये लिहिलेला होता. मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका” तर “मी यहूद्यांचा राजा आहे, असे या मनुष्याने म्हटले होते तसे लिहा.” तेव्हा पिलाताने उत्तर दिले, “मी जे लिहिले, ते लिहिले.” सैनिकांनी येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांनी त्यांची वस्त्रे घेतली आणि एकाएका सैनिकाला एक असे त्याचे चार विभागामध्ये वाटप केले, फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा अंगरखा शिवलेला नसून वरपासून खालपर्यंत संपूर्ण विणलेला होता. ते एकमेकांना म्हणाले, “त्याचा अंगरखा आपण फाडू नये, आपणापैकी तो कोणाला मिळावा, हे पाहण्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकू या.” यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाला: “त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली, आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या.” म्हणूनच त्या सैनिकांनी याप्रमाणे केले. क्रूसाच्या जवळ येशूंची आई व तिची बहीण, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालिया उभ्या होत्या. मग येशूंनी आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्यांची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा पुत्र!” आणि त्यांनी त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
योहान 19 वाचा
ऐका योहान 19
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 19:18-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ