YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 11:4-15

योहान 11:4-15 MRCV

येशूंनी हा निरोप ऐकला, तेव्हा ते म्हणाले, “या आजाराचा शेवट मृत्यूत होणार नाही. तर परमेश्वराच्या गौरवासाठी होईल आणि त्याद्वारे परमेश्वराच्या पुत्राचेही गौरव होईल.” मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती, तरी लाजर आजारी आहे हे ऐकूनही येशू ज्या ठिकाणी राहत होते, तेथेच अधिक दोन दिवस राहिले. यानंतर ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “चला आपण परत यहूदीयात जाऊ.” परंतु शिष्य म्हणाले, “गुरुजी, थोड्याच दिवसांपूर्वी यहूदी आपल्याला धोंडमार करण्याचा प्रयत्न करीत होते आणि तरी आपण पुन्हा तेथे जाता काय?” येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दिवसात बारा तास प्रकाश असतो की नाही? जर कोणी दिवसा चालतो तर अडखळत नाही, कारण या पृथ्वीवरील प्रकाशामुळे त्याला दिसते. जेव्हा एखादी व्यक्ती रात्री चालते तेव्हा ती अडखळते, कारण तिच्याजवळ प्रकाश नसतो.” असे म्हटल्यानंतर, मग येशू त्यांना सांगू लागले, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी जाऊन त्याला झोपेतून जागे करतो.” त्यांचे शिष्य म्हणाले, “प्रभुजी तो झोपला असेल, तर बरा होईल.” येशू तर लाजराच्या मरणाविषयी बोलत होते, परंतु शिष्यांना वाटले की ते नैसर्गिक झोपेविषयीच बोलत आहेत. मग येशूंनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, “लाजर मरण पावला आहे, तुमच्यासाठी मी तेथे नव्हतो म्हणून मला आनंद होत आहे, यासाठी की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.”

योहान 11 वाचा

योहान 11:4-15 साठी चलचित्र

योहान 11:4-15शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती