जेव्हा यहूदी पुढार्यांनी यरुशलेम येथून याजक आणि लेवी यांना योहानाकडे विचारपूस करावयास पाठविले की तो कोण आहे, त्यावेळी योहानाने दिलेली ही साक्ष होय. तो कबूल करण्यास कचरला नाही, त्याने मोकळेपणाने सांगितले, तो म्हणाला, “मी ख्रिस्त नाही.” त्यावर त्यांनी परत विचारले, “मग तुम्ही कोण आहात? तुम्ही एलीयाह आहात काय?” त्याने उत्तर दिले, “नाही.” “मग आपण संदेष्टा आहात काय?” त्याने उत्तर दिले, “नाही.” शेवटी ते म्हणाले, “तर मग आपण आहात तरी कोण? आम्हाला सांगा, म्हणजे ज्यांनी आम्हाला हे विचारण्यास पाठविले आहे त्यांना उत्तर देता येईल.” यशायाह संदेष्ट्याच्या शब्दात योहानाने उत्तर दिले, मी अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी आहे, जी म्हणते, “ ‘प्रभूचा मार्ग सरळ करा.’ ” आता ज्या परूश्यांनी त्यांना पाठविले होते, त्यांनी प्रश्न विचारला, “तुम्ही ख्रिस्त नाही, एलीयाह नाही व संदेष्टाही नाही तर तुम्ही बाप्तिस्मा का करता?” तेव्हा योहान उत्तरला, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु तुम्हामध्ये एकजण असा आहे की, ज्याला तुम्ही ओळखत नाही. तो हाच आहे जो माझ्यानंतर येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासाठी एक दास होण्याची देखील माझी पात्रता नाही.”
योहान 1 वाचा
ऐका योहान 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 1:19-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ