YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 43

43
1जेव्हा यिर्मयाहने याहवेहचे वचन सर्व लोकांना सांगणे संपविले—जे सर्व त्यांना सांगण्यास याहवेह त्यांचे परमेश्वर यांनी त्याला पाठविले होते—तेव्हा 2होशयाहचा पुत्र अजर्‍याह, कारेहचा पुत्र योहानान व इतर सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाहला म्हणाली: “तू खोटे बोलतोस! ‘तुम्ही इजिप्तला जाऊन तिथे वसती करू नये,’ असे आम्हाला सांगण्यास तुला आमचे परमेश्वर याहवेहने पाठविले नाही. 3नेरीयाहचा पुत्र नेरीयाहचा पुत्र बारूख याने तुला हे आम्हास सांगण्यास चिथविले आहे, म्हणजे आम्ही येथेच राहू आणि बाबिलोनच्या सैन्याकडून मारले जाऊ किंवा गुलाम करून बाबेलला नेले जाऊ.”
4अशाप्रकारे कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख व सर्व लोकांनी यहूदीयात राहण्याची याहवेहची अवज्ञा केली. 5यहूदीया जे इतर देशात विखुरलेले पण आता परत आलेल्या सर्व उरलेल्या लोकांना कारेहचा पुत्र योहानान, सर्व सेनाप्रमुख आपल्या देखरेखीत घेऊन निघाले. 6त्या जमावात पुरुष, स्त्रिया, मुले, राजाच्या कन्या व तसेच पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने अहीकामचा पुत्र, शाफानचा नातू गदल्याहच्या स्वाधीन केलेले सर्व लोक होते. त्यांनी यिर्मयाह संदेष्टा व नेरीयाहचा पुत्र बारूख ह्यांनाही आपल्याबरोबर घेतले. 7त्यांनी याहवेहची आज्ञा न पाळता इजिप्तमध्ये प्रवेश केला आणि ते तहपनहेस पर्यंत येऊन पोहोचले.
8तहपनहेस येथे यिर्मयाहला याहवेहचे वचन आले: 9“यहूदी लोक तुझ्याकडे पाहत असताना त्यांच्या समक्ष तहपनहेस येथील फारोहच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी फरसबंदीचे जे दगड आहेत, त्यांच्यामध्ये काही मोठे धोंडे मातीत पुरून टाक, 10आणि मग त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला इजिप्तमध्ये पाठवेन. मी त्याचे सिंहासन याच लपविलेल्या धोंड्यावर स्थापन करेन; मग तो त्यावर आपला राजमंडप पसरेल. 11तो येईल व इजिप्त देशावर हल्ला करेल, जे मृत्यूसाठी नियुक्त आहेत, त्यांना तो मृत्यू देईल, जे बंदिवासासाठी नियुक्त आहेत, त्यांना बंदिवासात टाकेल, आणि जे तलवारीसाठी नियुक्त आहेत, त्यांचा तो तलवारीने वध करेल. 12तो इजिप्तच्या दैवतांच्या मंदिरांना आग लावील; तो त्यांची मंदिरे जाळून त्यांच्या मूर्ती ताब्यात घेईल. एखादा धनगर आपल्या अंगरख्यातील पिसवा वेचून स्वच्छ करतो, त्याप्रमाणे तो इजिप्त देशातील सर्व वेचूनवेचून लुटून नेईल. 13तसेच इजिप्तमधील सूर्यदेवतेच्या#43:13 किंवा हेलिओपोलिस मंदिरातील बेथ-शेमेशचे स्तंभ नष्ट करून तो मोडून टाकील व इजिप्तच्या दैवतांची मंदिरे जाळून भस्म करेल.’ ”

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 43: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन